गाता चतुराक्षरी मंत्र दत्त नाम

गाता चतुराक्षरी मंत्र दत्त नाम । देईल तो प्रेम स्वामीराया ।
शंख - चक्र गदा वसे ज्याचे हाती । मेळा तो सांगाती गोश्वानांचा ॥
औदंबरछाया साजरी दिसे ती । खडाऊ शोभती पायी बरे ॥
म्हणे तुकड्यादास कृपा करी दत्ता ! । सखया ! पतिता तारी तारी ॥