सर्वतीर्थ माजी तीर्थ पंढरपुर
सर्व तीर्थामाजी तीर्थ पंढरपूर । करिती व्यवहार देव तेथे ॥
जाती लोटांगणी मान तो त्यागुनी । तेणे होय झणी संतकृपा ॥
चंद्रभागे ज्याने केले एक स्नान । तरे तो दुर्जन जरी झाला ।।
तुकड्यादास म्हणे भाव ज्याचे गाठी । भेटे उठा उठी देवराणा ॥