अनंत पुण्याते करुनी

अनंत पुण्याते करूनी । येई प्राणी ये चरणी ॥
करी बहू अनुष्ठान । तया चंद्रभागे स्नान ॥
ज्यासी गुरुकृपा पुरी । तोचि पाहील पंढरी ॥
तुकड्या म्हणे ऊर्ध्व प्राण । पाही विठ्ठल - चरण ॥