सुंदर स्वरूप आजी पाहिले मी डोळा

सुंदर स्वरूप आजि पाहिले मी डोळा ।
विटेवरी उभा राहे, कान्हिया   सावळा ॥घृ०।।
पुंडलिकाच्या कारणे, आला विटेवरी ।
वाहे चंद्रभागा सदा, कर    कटेवरी ॥
साह्यकारी हरी, माझा भक्त - कल्पद्रुम ।
तरतील बह पापी, उच्चारिता नाम ॥
लाज राखी आज माझी, सखया ! कान्हया ! ।
तुकड्या म्हणे शरण आलो, तोडी माझी माया ॥