सावळे स्वरूप गोड वाटे मज

सावळे स्वरूप गोड वाटे मज । अंतर सहज शांत झाले ॥
येशी जरी ऐसा धावत हृदयी । ठेवीन मी डोई चरणी तुझ्या ॥
ब्रह्मरसे जैसे ओतले स्वरूप । झणी माझा बाप क्षेम देई ॥
तुकड्यादास म्हणे सगुण सुंदरा ! । येई रुक्मिणीवरा ! धावत गा ॥