काय वर्णू राया तुझे गुण आता

काय वर्णू राया । तुझे गुण आता ? । धाव जगत्राता l
श्रुतिवेद बोले तुज नेति-नेति । तेथे माझी मती काय चाले ? ।।
गुणदोष माझे माफ ते करून । येऊ दे चरण हृदयात ।।
हेचि कृपादान देई प्रभुराया ।। तुकडयाचि माया तोडी वेगे ॥