तरती सागरी पाषाण

तरती सागरी पाषाण । ऐसे तुझे गा ! महिमान ।।
भक्त ध्रुव तो तारिला । अढळपदी स्थापियेला ॥
येशी प्रल्हादाकारण । स्तंभी प्रगटोनी जाण ।।
तुकड्या म्हणे ठाव देई । लोटांगणे लोळिन पायी ॥