करि कोण दुजा, सदगुरुविणा ?
(चालः मंगलमय नाम तुझे..)
करि कोण दुजा, सदगुरुविणा ? ।|धृ०।।
दूर देश त्या हरिचा, थाक नाहि वैखरिचा ।
नाहि परेच्या परिचा, कोणि पाहुणा ।।१।।
वेद नेति गाति जया, दीनांची काय मया ?
संतसंगतीच दया, दावि त्या खुणा ।।२।।
चंद्र, सूर्य ना भवती, पंचतत्व ना शिवती ।
दीनांची काय मती, पुरवी कामना ? ।।३।।
तुकड्याची एक आस, पुरवी गुरु पुर्ण खास ।
ताराया तनु-जिवास, घ्या कृपा मना।।४।।