अंतरी इच्छा अशी, वाहते सदा रे माधवा !!

(चालः क्यों नहीं देते हो दर्शन..)
अंतरी इच्छा अशी, वाहते सदा रे माधवा !!
कोण पुरवी आस ही, तुज वाचुनीया केशवा ? ।।धृ०।।
सृष्टि ही नांदो सुखे, झणि सौख्य इहपर भोगण्या |
द्रोह ना वाढो कधी, जीवा - जिवाशी   राघवा ! ।|१॥
निंदका सद्बुध्दि हो, हो पापिया सुमती सदा ।
ऐक्य हो राजा-प्रजा, साधू जसे   जीवा - शिवा ॥२॥
सृष्टिसौंदर्य रमो, नांदो सदा कांती वनी ।
वीरपुत्रा तेज हो, लढण्या   रणी   भासो   नवा ॥३॥
नष्ट हो ही दैन्यता, बलहीनता, दुर्भाग्यता।
निर्जीवता, परकी सत्ता, झळको स्वातंत्र्याचा दिवा ॥४॥
काय करणे याजसाठी ? बुद्धि दे दीन पामरा ।
दास तुकड्या मागतो, दे भीक  जीवीच्या   जिवा ! ॥५॥