सावळी मूर्ति ही गोजिरी
(चाल: रूसलासी हरि! का बरे...)
सावळी मूर्ति ही गोजिरी । पाहतांना मनासी हरी ।।धृ०।।
अति कोमल चरणांगुले, सिंहासनि शोभति चांगले ।
गळा वैजयंती साजिरी । पाहतांना मनासी हरी 0।।१।।
कटि पीतांबर साजिरा, शिरि मोर-पिसांचा तुरा।
वाजवीतो मधुर बासरी । पाहतांना मनासी हरी० ॥२॥
दास तुकड्या म्हणे ध्यान हे, आमुच्या जीविचे प्राण हे ।
मुक्ति लाभे, जपा अंतरी । पाहतांना मनासी हरी0।।३॥