किति शांत उदात्तहि मूर्ति तुझी ।

(चालः गुरु तुमहि तो हो...)
किति शांत उदात्तहि मूर्ति तुझी ।
मनि लावितसे अति वेड मला ।।धृ०।।
पद-कमलावर तुळशि-दले ही, शोभति उटिया पद-युगुला ।।१॥
वक्षस्थळावर माळ विराजे, कटि   पीतांबर   हा   कसला ।।२।।
मोरमुकुट हा अति झळके शिरि, अर्धरि धरी पावा अपुला ।।३॥
तुकड्यादास म्हणे मज शेवटि, देशिल ना प्रभु ! भेट खुला ।।४॥