वाजवी प्रभु ! गोड वेणू वाजवी
(चाल : मोहनी मूरत तुम्हारी भागयी...)
वाजवी प्रभु ! गोड वेणू वाजवी ।
मोहिनी या बंसिची हृदयास लागू दे चवी ।।धृ०।।
चित्त हे झुरते सदा, ती मधुर बंसी ऐकण्या ।
काढ हा पट आडवा, मन लागु दे रुप पाहण्या ।।१।।
श्यामसुंदर कटि पितांबर, मूर्ति चिमणी साजिरी l
कुंजवनिच्या गोपिकांना, तारिशी तू निर्भरी ।।२।।
दास तुकड्या प्रेमयोगी, बंसरी द्या मागता।
ना हवे मग दूसरे मज, गंधही त्या स्वर्गिचा ।।३॥