आळसाचे मूळ निराशेचा वृक्ष

आळसाचे मूळ निराशेचा वृक्ष 
अज्ञानाचा पक्ष राहे सदा ।।धृ।।
आवडे विषय हौस वासनेची । 
स्वप्नाच्या सुखाची, तृप्ती सदा ।।१।।
निदास्तुती खाद्य रसना चहाडी । 
निशा सर्व हाडी शौकियाच्या  ।।२।।
तुकड्यादास म्हणे तया नोहे बोध । 
तयाचा संबंध यमापाशी ।।3।।