त्या प्रीय शंकराला, जिव पाहण्या भुकेला

(चाल: या प्रीय भारताचा जिव...)
त्या प्रीय शंकराला, जिव पाहण्या भुकेला ।
कैलासिच्या शिवाला, कुणि भेटवा अम्हाला ।।धृ०।।
नरमुंड-माळधारी, विष-सर्प ते शरीरी।
अवधूत वेषवाला, जिव    पाहण्या   भुकेला ।।१।।
व्याघ्रासनी विराजे, लल्लाटि चंद्र साजे ।
डमरु-त्रिशूलवाला, जिव  पाहण्या   भुकेला ।।२।।
शोभे जटेत गंगा, राही पिवोनि भंगा ।
अलमस्त बैलवाला, जिव  पाहण्या   भुकिला।।३।l
नाचे पिशाच्च संगे, जो भिल्लिणीशि रंगे।
वश होय भाविकाला, जिव पाहण्या  भुकेला ।।४।।
करि शंख, नाद रुंजे, मुखि राम-राम गुंजे।
क्षणि जाळिले मदाला,जिव पाहण्या भुकेला ।।५।।
तुकड्या तयास ध्यायी, ध्यानी दिसो सदाही।
हा हेत पुरविण्याला, जिव  पाहण्या   भुकेला  ॥६॥