क्रोधियासी करू नये बोध

क्रोधीयासी की करू नये बोध । 
तयाचे ते शुद्ध मन नोहे ।।धृ।।
अविश्वासी नर चेवला भक्तिसी । 
कधी नये त्यासी ज्ञान सांगो ।।१।।
कामिकाचे मन भ्रष्टले कुकर्में । 
शया शास्त्र-वर्में  सांगू नये ।।२।।
तुकड्यादास म्हणे आर्त नाहीं झाला । 
ब्रह्ज्ञान त्याला सांगू नये ।।3।।