चीड येते मला काही हरदासाची

चीड येते मला काही हरदासांची 
 सांगती कृष्णाची बाळकीडा ॥धृ॥
दुर्जन है लोक तया काय कळे ? । 
म्हणती सांवळे ऐसे केले ॥1॥
तरि आम्हां काय भोगाया परक्या । 
श्रीकृष्णाची आख्या पहा जरे  ॥2॥
कोण जाणे त्याचे गुण अधिकार । 
तुकडया म्हणे येर भोग पाहे  ॥3॥