असं वेड लावशिल कधी ?
(चालः कशी मोहनी घातली गुरुनं...)
असं वेड लावशिल कधी ? मी विसरिन माझी सुधी ।। धृ०।।
तुज वाचुनि कवणा रुसू ? गे माय ! कुणाला पुसू ? ।।१।।
हा देह मी म्हणता भला, स्वात्मता न उरली मला ।।२।।
संशयी वृत्ति पाहुनी, अग ! लाज वाटते मनी ।।३॥
नच विरे गर्व बापुडा, सोडिचना अपुला धडा ।।४॥
जाणीव वाढली जरी, तरि अंधपणा वावरी ।।५॥
तुकड्यास ठाव दे अंता, नच भासो देहात्मता ।।६।।