सुखशांति या जगि ना दिसे
(चालः शिवशंकरा गंगाधरा...)
सुखशांति या जगि ना दिसे, जन हे पिंसे, फिरे वायसे ।|धृ०।।
अति थोर राजा, जयाचा अगाजा !
धरि लोभ तोही, मनासी रुसे, दुःख-सायसे ।।१।।
रमे रम्य लोकी, मुखासी विलोकी।
झुरे अंतरीही, करावे कसे ?, दुःख-सायसे ।।२।।
गडी तुकड्याचा, कुणी ना कुणाचा ।
झरा स्वारथाचा, मुळाशी वसे, दुःख-सायसे ।।३।।