श्रीकृष्ण गिळिला बारा गावे अग्नी

श्रीकृष्णे गिळिला बारा गावे अग्नि । 
यासी कोलत्यानी ताण लागे ॥धृ॥
तयाने अंगुली धरिला पर्वत । 
टोपलीये खत न घरवे येणे ॥1॥
सांगे लोका देव व्यभिचार करी। 
आम्ही केले तरी काय झाले ? ॥2॥
तुकड्यादास म्हणे बोलक्या गपोड्या । मारताती उड्या बातोबाती ॥3॥