समाधान हे विषयी नसे
(चाल: शिवशंकरा गंगाधरा...)
समाधान हे विषयी नसे । पाहता दिसे,कळे सायसे ।।धृ०।।
विचारी मना रे ! त्यजी सर्व वारे ।
धरी संत - पाया, सुखं देतसे, कळे सायसे ।।१।।
सुखी कोण झाला ? जगी या निवाला ?
न राजा दिसे बा ! प्रजाही नसे, कळे सायसे ।।२।।
गडी तुकड्याचा, हरी हा सुखाचा ।
धरी भाव याचा, सुखी व्हा असे, कळे सायसे ।।३।।