थोरांचे चरित्र प्रसंगी लावावे

थोरांचे चरित्र प्रसंगे लावावे । 
जाणोनी करावे कार्य भूमी ॥धृ॥
जन हासताती गोपिचिया प्रेमे । 
कळेना ही वर्में हरिंदासांसी ।।1॥
दोषेही विषयी श्रोते वक्ते झाले । 
देव धर्म नेले कुमार्गासी  ॥2॥
तुकड्यादास म्हणे आजींच्या समाजा । कुरुक्ष्रेत्र गाजा गाजवावा ॥3॥