श्रीकृष्ण अर्जुन संवाद लावावा
श्रीकृष्ण-अर्जुन-संवाद लावावा ।
जनाचीया भावा नेम लागे ।।धृ।।
देवे ऐसे केले तुम्ही का निश्चित ? ।
काय तुम्ही भक्त नाही त्याचे ? ।।1।।
सांगता श्रीकृष्ण देव भारताचा ।
बोध कां तयाचा कोणी न घ्या ? ।।2।।
तुकड्यादास म्हणे पटोनिया दयावे ।
हळुचि लावावे कृष्ण-कृत्यीं ।।3।।