आपुलेचि रडू सांगे लोकांपाशी
आपुलेची रडू सांगे लोकापाशी ।
काय इतराशी तारील तो ? ॥धृ॥
स्वतःचाची स्वार्थ भरला अंतरी ।
निष्कामची थोरी कोण ऐकी ? ॥1॥
विषयांच्या साठी झरे रात्रदिन ।
ऐकाया पुराण कोग येई ? ॥2॥
तुकड्यादास म्हणे आवरावे आधी।
तरी घ्यावि संधी बोलायाची ॥3॥