चला हो ! हरिगुण गाऊ चला
(चाल : सुदामजी को देखत श्याम...)
चला हो ! हरिगुण गाऊ चला ॥धृ०॥
भिन्न मतांना विसरुनी जाऊ ।
मानवता समतेने दावू ।
निजसुख पाहू चला ॥चला हो ! ॥१॥
विसरुनी जाती जे अभिमाना ।
तेच प्रभुच्या लागति ध्याना ।
मिळुनिच जाऊ चला ॥ चला हो ! ॥२॥
गुण गाऊ निर्मल भावाने ।
समुदायाने एकमताने ।
सुखे सुखावू चला ॥ चला हो ! ॥३॥
सर्व जिवांचे हित हे जेथे ।
तेचि हरीचे निर्मळ गाथे ।
भाव दाखवू चला ॥ चला हो ! ॥४॥
तुकड्यादास म्हणे या या ना ।
अपुले -परकेविसरुनि जाना ।
मुळीच समावू चला ॥ चला हो ! ॥ ५॥