चला चलाना मिळोनी
(चाल: पिया मिलन को जाना..)
चला चलाना मिळोनी ।
प्राथने जाउया गाउया पाहू्या ॥ चला o ॥धृo॥
भूमी किति सजविली फुलझाडेही ठेविली ।
अति शिस्तही आणिली या रे तिथे बैसु या या ॥१॥
किती हे उत्साहती गुरुदेव पाहती I
अति नम्रता अति शांतता येथे गमे राहु या या ॥२॥
गंभीर हा ध्वानि ये पहा ।
तुकडया म्हणे सर्वही पंथा करु एक या या ॥३॥