सदगुरुचे गुण नाम, गाइ मनोभावे

(चाल: हरिभजनावीण काळ...)
सदगुरुचे गुण नाम,   गाइ    मनोभावे ।।धृ०।।
सद्गुरुचे गुण नाम, गाइ
संसारी सर्व मिळे, व्यवहारी सर्व कळे ।
परि गुरुगम्यचि विरळे, नाहि जगा ठावे ॥१॥
सागर उतरेल पार, वायुगमनीहि फार।
गुरुची महिमा अपार, नाहि कुणा   पावे ।।२ll
अमृत मंथने निघेल, जीव मस्त हा बनेल।
गुरु - ज्ञानाविन कुणी, शेवटी   न   धावे ॥३॥
तुकड्याची एक आस, सद्गुरुचि पुरवि खास ।
करुनी भवदु:ख नाश,  अंतकाळि   पावे ॥४॥