सावळा मुरारी, अमुच्या रंगि रंगला

(चालः आकळे न अरघटित घटना....)
सावळा मुरारी, अमुच्या रंगि रंगला ।
विसरूनी न जाऊ आम्ही, संग हा भला ।।धृ०॥
जाउ जिथे पाही तेथे, आपणची मागे येते ।
विसरिना कधी आम्हाते,   मोहिला  भला ।।१।।
नेत्र मिटोनीया बसता, भासतसे हसता हसता ।
खेळ खेळता नी निजता,  सोडिना   मला ।।२।।
सृष्टिसुखा पहाया जाता, मार्गि लावितो हा चित्ता ।
भासवितो अपुली सत्ता,   दावितो   कला ।।३॥
इनाठविता आठव देई, आठविता जवळी राही।
देउनिया तुकड्या ग्वाही,  सांगतो   खुला ।।४।।