चल उठ धीट होई भीती सोड जनाची

(चाल : मन शुद्ध तुझ गोष्ट आहे .. )
चल उठ धीट होई भीती सोड जनाची ।
भक्ति करावयास शरम आली कशाची ? ।
लाज कोणती याची ? ॥ धृ 0॥
घे खंजिरी हाती नि नीट बैस आसनी ।
लावोनि ध्यान श्रीहरीसि आळवी मनी ॥
जे सत्य असे बोल जगी भावना साची । भक्ति करा ० ॥१॥
दुर्व्यसना सोडुनि दे आळसा न घे ।
कार्य करी निर्भयता धरुनि पाय घे ॥
तू चाल पुढे वाट लाट हरुनि विषाची । भक्ति करा ० ॥२॥
रंक असो राव असो वा असो कुणी I
मागण्यास जाउ नको मागण्या जनी ॥
हाक घे तुकड्याचि वाट सुधर यशाची । भक्ति करा 0 ॥३॥