सुजन हो ! ऐका कर्म कथा ।

(चाल : सुजन हो ! परिसा रामकथा..)
सुजन हो  ! ऐका कर्म कथा ।
सोडुनी आणिक विरह-व्यथा ॥धृ०॥
लोपला वीर हनुमान अर्पुनी प्राण राम कार्यासी ।
ते कार्यचि आहे आज उभे हृदयाशी ॥१॥
व्यक्तिचे प्रेम का तुम्हा ? मार्ग नच क्रमा कर्म करण्यासी ।
तो आजहि आहे राम आपणापाशी ॥२॥
हरवली आजही सिता कसे पाहता ऐकता कानी ?
व्हा उभे धर्म-रक्षणा बना अभिमानी ॥४॥
वाचता पुराणे किती ? आपुली मती भ्रष्ट ती झाली I
म्हणूनीच भारता अशी दुर्दशा आली ॥४॥
या चला करू प्रार्थना जगज्जीवना जगा सुखवाया ।
तुकड्याची ऐकूनी हाक उठा सत् कार्या ॥५॥