छळतील किती असेल जन हे ?
( चाल : निघते पद एक घरी ... )
छळतील किती असेल जन हे ? मज दुःख अता नच पाहवते ।
नच पाहवते करू काय तिथे ? मन नावरते बघता दुरिते ॥धृ 0॥
नच अन्न मिळे गरिबा मजूरा रडताति मुले पडती धरणी I
कपडा न मिळे रडते अबला ही लाज तया नच साहवते ॥१॥
बघ शेतकरी चिंतातूर हे नेताति लुटोनी द्रव्य बळे I
वद काय तया जवळी असते ? असते असले दुरुनी दिसते ॥२॥
धनिकांस जरा नच ज्ञान असे अपुले म्हणुनी पिळताति जसे ।
देताति प्रसंगी दंड महा करिताति पुढे घरदार रिते ॥३॥
अति लोभिपणा न रुचे प्रभुला म्हणतात जसे दिसते न तसे ।
तुकड्या म्हणे आज असेचि गमे बघु या पुढती करि तो हरि ते ॥४॥