जीव झाला कासावीस I
जीव झाला कासावीस । चैन न वाटे जीवास ॥ धृ ॥
कधी दिसती हरिचे पाय । मन होईल निर्भय ? ॥ १ ॥
सांगा सांगा सांगा कोणी । मी येतो लोटांगणी ॥ २ ॥
तुकड्या म्हणे वेडा पिसा । भीक घालावी या दासा ॥ ३ ॥