थारा ऐसा द्या चरणी I
थारा ऐसा द्या चरणी । पुन्हा न ये परतोनी ॥ धृ ॥
मन लागावे भजनी । नाम जपो जनी वनी ॥ १ ॥
काय करायाचे करा I परि भीक द्या लेकरा ॥ २ ॥
तुकड्या म्हणे पूरवा आस । नका होऊजी ! उदास ॥ ३ ॥