वळेना मन अभ्यासाने , अनावर फिरते अभिमाने
( चाल : कळेना अजुनी काही मला . . . )
वळेना मन अभ्यासाने , अनावर फिरते अभिमाने ।।धृ।।
ग्रंथपठन हे कितितरि केले , तिर्थाटन पायी अनुभवले ।
शिणली वाणि , नामहि जपले ।
थकले देहाने जीव - प्राणे , फिरते अभिमाने ।
वळेना मन अभ्यासाने ॥१॥
संत - पदांना स्पर्शहि केला , धूळ त्यांचि धरली माथ्याला ।
परि बोधाचा क्षण नच आला ।
तुकड्यादास म्हणे ! ज्ञानाविण , फिरते अभिमाने ।
वळेना मन अभ्यासाने ! | ॥२॥
- तेलखेड - पंढरपूर दौरा , दि . १९ - ०९ - १९६१