किती वेळ तुला समजाऊ मना ?
( चाल : मन - मन्दिर में शृंगार किया . . )
किती वेळ तुला समजाऊ मना ?
येऊ दे अतातरि विषय - घृणा ! ।। धृ ।।
दश इंद्रिय हे रावण नामी ।
नष्ट करी निज भक्ति - गुणा ! ।। १ ।।
तुजसि आवडे भोग सकलही ।
त्यागाविण नच शांति कुणा ! ll २ ll
अमर - पदाची प्राप्ति कराया ।
धरि सत् - संगति रे सुजना ! ॥ ३ ॥
निंद्य पदाला वयं करोनी ।
वंद्य पदाला पात्र बना ! ॥ ४ ॥
तुकड्यादास दाहि दिशेनी
हरि - स्मरण उध्दरि जाणा ॥ ५ ॥
- वरोरा , दि . ०२ - ११ - १९६१