लपवुनि ठेविशि काय, राधिके
लपवुनि ठेविशि काय, राधिके? ।। लपबुनि० ।।धू०।।
सांग हरि दिसला का तुजला? मनमोहन यदुराय।।रा०।।१॥।
तुजवाचुनि हरि क्षणहि न राही,पुण्य किती तव माय !।।रा०।।२॥।
वेडि-बावरी वृत्ति आमुची, पाहते हरिचे पाय।।रा०।।३॥।
कुंजवनी रमला, गमला का? रोज गोधनी जाय।।रा०।।४॥|
तुकड्यादास म्हणे हरिविण गे! जीव खातसे हाय।।रा०।।५॥।