किति उत्तम , सुंदर मंदिर हे

८७५ भजन 
( चाल : तेरि प्यारी पूरतियाँ . . . ) 
किति उत्तम , सुंदर मंदिर हे , मन पाहता स्थिर होतसे ,
अरे   बघु   या ! ! 
किति निर्मळ मूर्ति शोभतसे , मन पाहता स्थिर होतसे , 
अरे   बघु   या  ! ! ॥ धृ० ॥ 
सरळ विटेवरी मूर्ति दिसे , कटावरी कर धरिले से ।
कटी पितांबर मुकुट शिरावर , वैजयंति हृदयी विलसे । । 
किति उत्तम , सुंदर मंदिर हे0 ।। १ ।। 
रत्न - जडित कुंडल झळके , प्रभा जशी गगनी फाके । 
अमृत श्रवते मुखावरी ते , बोलतसे जणू हासतसे । । 
किति उत्तम , सुंदर मंदिर हे० ॥ २ ॥ 
संत - मंडळी भजन करी , अंबर गर्जे जणू वरी । 
टाळ - झांजरी - मृदंग भारी , थै - थै नाचत भान नसे ॥ 
किति उत्तम , सुंदर मंदिर हे0 ॥ ३ ॥ 
भव्य सभा - मंडप बघता , हरपे सगळी मनि चिंता । 
तुकड्यादासा अनुभव ऐसा , घडी - घडी मनि येत असे ॥ 
किति उत्तम , सुंदर मंदिर   हे ॥ ४ ॥ 
- गुरुकुंज आश्रम , दि . ०१ - ११ - १९६१