गवसला कृष्ण जया हाता तया मग
( चाल : गौळणी सांगति गाऱ्हाणी ... )
गवसला कृष्ण जया हाता तया मग राहिली काशि चिंता ? I
झाला तो जिवभावा परता निरसली मोह माया ममता ॥धृ0॥
जग त्याला जगचि ना भासे
दिसे सारे कृष्णरुपचि विलसे ।
कुठली त्या देहाची रे अहंता ॥ तया 0 ॥१॥
कृपा करी गुरु येऊनि खासे
जरि लाभे कोणासी भाग्य ऐसे ।
जसा कोणी पार करि सरिता
तरला तो झाला भवापरता ।। तया 0 ॥२॥
तुकड्याची आस पुरी झाली
भेटली त्या ऐकायासी मुरली ।
जीव झाला निर्भय रंगी रंगता ।। तया 0 ॥३॥