अमर सुख सागा का न कळे ?
(चाल : सुदामजी को देखत श्याम..)
अमर सुख सागा का न कळे ? ॥धृ०॥
काय करावे कुणा स्मरावे ? कोण्या मार्गाने हरि ! जावे ?
जेणे मन आकळे ॥ अमर 0 ॥१॥
सगुण रुपाचे ध्यान कराया सांगा काय करु गुरुराया !
भजन कशाने फळे ? ॥ अमर 0 ॥२॥
किति एकांत करावा कोठे ? जीव जगे ना आता वाटे ।
नेत्र प्रभूविण जळे ॥ अमर 0 ॥३॥
तुकड्यादास म्हणे सांगाना संतमहंतांनो ? या याना ।
द्या हरि धरुनी बळे ॥ अमर 0 ॥४॥