हनुमंत धनी माझा

हनुमंत धनी माझा । वश झाला रामराजा ॥
काय उणे हो आम्हासी ? । शरण जाऊ चरणासी ॥
केली सीताशुद्धी    जाण । दुष्ट    रावणा    वधून ॥
तुकड्या म्हणे हनुमंता ! । बुद्धी देई गुणवंता ! ॥