काढायची चेंडू न जाति हो ! कोणी

काढावया चेंडू न जाती हो ! कोणी । देवाने धावोनी उडी दिली ॥
जैसी मारी उड़ी पाताळी तो गेला । सकळी पाहिला कृष्ण तेव्हा ॥
पाहूनी श्रीहरी, गर्जना तो करी । जागवाया त्वरी भुजंगासी ॥
तुकड्या म्हणे गर्व हरावया त्याचे । श्रीहरी तो नाचे तये स्थानी ॥