कोटी सूर्याचे ते तेज मुखावरी

कोटी सूर्याचे ते तेज मुखावरी । लावण्य श्रीहरी देखियला ॥
पाहताचि म्हणे कोण तू रे ! आहे ।सांग लवलाहे आम्हालागी।।
पुसे स्त्री तयासी पाहनिया रूप । सुटलासे कंप सकळा तेथे ॥
म्हणे आता बाळ खाईल हा काळ । तुकड्या म्हणे वेळ आली आता ॥