अशुद्ध शेतीवरी पिकेना सुंदर फल रे गड्या !

(चालः धन्य धन्य गे स्फूर्ति तन्मये... )
अशुद्ध शेतीवरी पिकेना सुंदर फल रे गड्या ! ।
शुद्ध कर मृतिका नरबापुड्या ! ॥धृ०।।
वर-वर घेउनि पिके, बुडविले शेत कसे त्वा अरे ? ।
अता का घेशि कर्म - नांव रे ? ।
वाढविले शेतात वृक्ष बह, काम जयांचे नसे ।
उडविले पैसे, खाली खिसे ।।
पूर्वपुण्य तव उदय पावुनी शेत मिळाले बरे ।।
हरे जरि करशिल सुखहाव रे ! ॥
श्रीमंत संत तो धनी जगी धरवरी ।
जा शरण तयाला चरण धरी वरवरी ।
घे मत त्याचे मग शेत पिके  भरपुरी ।
विवेकशस्रा  घेउनि   हाती, वृक्ष तोडि शूर गड्या ! ।
शुद्ध कर मृतिका नरबापुड्या ! ।।१।।
धर नांगर, ज्ञानाग्नि चक्षूने जाळि अज्ञ-वृक्षया ।
पालवी - खोड मुळासह तया ।
बैल कामक्रोधादि जुंपुनी, माया - जू धर वरी ।
साफ कर देह - शेत अंतरी ।।
असत्य दिसते सत्य जये, ते फेकि विषय बाहिरी ।
फळे मग ब्रह्म पीक भूवरी ।
हो धन्य सुखे खाउनी फळे निर्मल ।
फलरुप दिसे मग शेत कुणी पाहिल ।
पाहुनी करी जग तुझेचि हे   राहील ।
ब्रह्मफलाच्या रुपे दिसे तनु - शेती चांगुल गडया ।
शुद्ध कर मृतिका नरबापुड्या ! ॥२।l
देह-शेत हे अशुद्ध जाणुनि, शुद्ध करी रे ! तया ।
धरी सत्संग स्वच्छ व्हावया ॥
पुण्यपिके ही संस्कारे तू शेतीवरि क्रमविली ।
नष्ट कर्मात स्पष्ट गमविली ।।
विषय वृक्ष है पाच जाण रे ! कुबुध्दि जलि वाढले ।
शस्त्र लावुनी न ते काढले ।।
शेतिने बद्धपण आले गा ! तुजवरी ।
मारिती श्रृंग कामादि बैल गुरगुरी ।
होउनी स्वार तुजवरी दिली नोकरी ।
घेड़ तुती श्रीगुरुनामाची, मारि तयासी गङ्या !
शरण तो मग येईल तुकङ्या ।।३।।