श्रीहरी भेटवा कोणी, त्या बसविन हृदयस्थानी

(चाल : राजहंस माझा निजला...)
श्रीहरी भेटवा कोणी, त्या बसविन  हृदयस्थानी ।।धृ०।।
त्या पहाया नेत्र भुकेले, कर्ण हे तीक्ष्ण किति झाले ।
जिव जरा उरी ना मानी, त्या बसविन हृदयस्थानी ।।१।।
ह्या सुंदर वृक्षाखाली, मी पाहिन तो वनमाळी ।
सांगेन जिवाचि कहाणी, त्या बसविन हृदयस्थानी ॥२।।
ह्या झुळंझुळ ओढ्याकाठी, मज दिसेल तो जगजेठी ।
धावूनि मी केविलवाणी, त्या बसविन  हृदयस्थानी ॥३॥
ह्या  सुरम्य गुंजातळुनी, मी गाइन हरिला गाणी ।
तुकडया म्हणे पूजिन ध्यानी, त्या बसविन हृदयस्थानी ॥४॥