वाजविना बासरी कन्हैया ! काहि सुचेना मला

(चाल : रागे कशाला भरलिस राधे..)
वाजविना बासरी कन्हैया ! काहि सुचेना मला ॥धृ०॥
शुध्दचि गेली या शरिराची विरली भावना संसाराची ।
मनमोहन व्यापला मोहन व्यापला मोहन 0 ॥१॥
जिकडे पहावे तिकडे मुरली मुरली वाचुनी चैन न उरली ।
जीव बावरा झाला बावरा झाला   बावरा 0 ॥२॥
काही म्हणो कोणी मज आता सोडुचि ना वाटे भगवंता !
कृष्ण मनी संचला  मनी    संचला   मनी 0 ॥३॥
तुकड्यादास म्हणे त्या नादे मन उन्मन झाले आनंदे ।
जीव भाव निरसला भाव निरसला   भाव 0 ॥४॥