जवळिच बसला कारे कन्हैया ?
(चाल :रागे कशाला भरलिस राधे..)
जवळिच बसला कारे कन्हैया ? काय कुणाला भिला ?॥धृ0॥
दुर जराही होतचि नाही जिकडे पहावे तिकडे राही ।
जनी वनी व्यापला वनी व्यापला वनी 0 ॥१॥
चल खेळू दे संसाराशी जिव-भावाशी देह -सुखाशी ।
का न सोडिशी मला ? सोडिशी मला सोडिशी 0 ॥२॥
आधिच कळले असते असले तरि मग कोणा नसते वरले।
आज तू कळला मला कळला मला कळला 0 ॥३॥
कितितरि सुंदर तुझि बघ कांति दिसशी उभा लोकी एकांती ।
आत-बाहेर संचारला बाहेर संचारला बाहेर 0 ॥४॥
तुकड्यादास म्हणे तू होता परि मज अजुनी दिसला नव्हता ।
भक्तिप्रेमे गवसला प्रेमे गवसला प्रेमे 0 ॥५॥