जो भक्तीने आकळतो तोचि सत्कार्याने मिळतो !
(चाल : जो आवडतो सर्वाला.)
जो भक्तीने आकळतो तोचि सत्कार्याने मिळतो ! ॥ धृ 0॥
कधि न कुणासी छळली वाणी निंदा कधि ऐकिली नच कानी ।
पाऊल न पडे कधि अडरानी जो सरळपणाने जगता ॥१॥
शोषण करुणी संग्रहि नाही कष्टाविण जगणे न मुळीही ।
सात्त्विकता ढळली न कधीहि जा सुखदुःख दोन्ही सह तो ॥२॥
आप-पराचा भाव न ज्याला मानवतेचा नित्य भुकेला I
तुकडयादास म्हणे जो असला प्रभु त्यासचि रे ! हळहळतो ॥३॥