कोणी मारा सारा बाजू I
कोणी मारा सारा बाजू । जीव राजू आमुचा ॥ धृ ॥
परी ते दावा पाय डोळा । एक वेळा द्या ऐसी ॥ १ ॥
काय कराल ते करा । न ये माघारा मी आता ॥ २ ॥
तुकड्या म्हणे ऐसे होते । तरीच फळते दर्शनी ॥ ३ ॥