कोणी नाही आम्हा धड I
कोणी नाही आम्हा धड । गोड विठ्ठलाविना ॥ धृ ॥
तोचि आवडला मना । जीवाप्राणापासोनी ॥ १ ॥
काया कुरवंडावी तया I सदा पाया ठेवावी ॥ २ ॥
तुकड्या म्हणे जगज्जीवन । सकळ धन आमुचे ॥ ३ ॥