आम्हा नाही दुजा कोणी I
आम्हा नाही दुजा कोणी । एका विठ्ठलावाचुनी ॥ धृ ॥
आप्त गणगोत सारी । जीवलग ती पंढरी ॥ १ ॥
त्याचेविण शीण सारा । लटिका मोहाचा पसारा ॥ २ ॥
तुकड्या म्हणे मूळ घर । जीवाभावाचे माहेर ॥ ३ ॥