आम्हा सर्वकाळ धंदा |
आम्हा सर्वकाळ धंदा ।
एका भजावे गाेविंदा ॥ धृ ॥ हाती घेऊनिया टाळ । करू नामाचा सुकाळ ॥ १ ॥
वदे रंगी रंगुनि वाणी ।
नाम पावन वदनी ॥ २ ॥ तुकड्या म्हणे धरला लोभ । लाभ, लाभला दुर्लभ ॥ ३॥